व्हनाळी ग्रामस्थांचा अनोखा आदर्शवत संकल्प..!
. राष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू “ओजस”चा चटका लावणारा मृत्यू…!
. “ओजस”ची रक्षा नदी किंवा ओढ्यामध्ये न सोडता लावलेल्या 20 वृक्षांना टाकून एक वेगळा आदर्श समाजापुढे घालून दिला
कोल्हापूर : (लोकमानस न्यूज 4″ – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
पुणे येथे शिक्षणासाठी असलेल्या राष्ट्रीय खेळाडू “ओजस सचिन कळंत्रे याचा मागील (मे)महिन्यात मोटारसायकल अपघातात मनाला चटका लावणारा मृत्यू झाला. त्याच्या मूळ गावी व्हनाळी (ता. कागल) येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या आठवणी वृक्षाच्या रुपात जिवंत राहाव्यात, यासाठी त्याची रक्षा नदी किंवा ओढ्यामध्ये न सोडता लावलेल्या 20 वृक्षांना (वृक्षारोपण केलेल्या) टाकण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला. हा उपक्रम राबवून कळंत्रे कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे.
. राष्ट्रीय पातळीवर तीन वेळा सुवर्णपदक
व्हनाळी येथील ओजसने बॉक्सिंग खेळामध्ये राष्ट्रीय पातळीवर तीन वेळा सुवर्णपदक तर राज्य पातळीवर सहा वेळा राज्य पातळीवर सुवर्णपदक पटकावत आपल्या गावचे नाव देशपातळीवर पोहोचवले. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, दोन चुलते, आजा, आजी असा मोठा परिवार आहे.
. वयाइतकीच म्हणजेच 20 रोपांचे वृक्षारोपण
व्हनाळी येथील वृक्षमित्र व त्यांच्या कुटुंबीयांनी त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ गावातील मराठी शाळेच्या पटांगणामध्ये त्याच्या वयाइतकीच म्हणजेच 20 रोपांचे वृक्षारोपण व स्मशानभूमी येथे वृक्षारोपण करून “ओजस” ची रक्षा सर्व झाडांना टाकली .
या उपक्रमावेळी चुलते जितेंद्र कळंत्रे, राजेंद्र कळंत्रे,मामा उपसरपंच ओंकार कौदाडे,ओजसचे प्रशिक्षक प्रशांत मोटे,वृक्षमित्र सुभाष पाटील,संदीप कौंदाडे,प्रभाकर पाटील,राजेंद्र जांभळे अक्षय चौगुले,नेताजी कळंत्रे, दत्ता दंडवते,कुंभार सर,प्रकाश कुळवमोडे,महेश कौंदाडे,आकाश रांगोळे,संजय वाडकर,प्रदीप जाधव, सुनील जाधव,रवींद्र जाधव,जगदीश वाडकर,डॉ.उत्तम जाधव,पांडुरंग पाटील आदि उपस्थित होते.