कोल्हापूरकरांच्या पाहुणचाराने भारावून गेलो…

~ छत्रपती मराठा साम्राज्य आर्गोनायजेशनचे विक्रमसिंह भोसले यांनी केल्या भावना व्यक्त : ~ सकल मराठा समाज कोल्हापूरतर्फे दुबई वरून कोल्हापूरात आल्यानंतर विक्रमसिंहभोसले व प्रियांका भोसले यांचा सपत्नीक सत्कार

कोल्हापूरकरांच्या पाहुणचाराने भारावून गेलो…

~ छत्रपती मराठा साम्राज्य आर्गोनायजेशनचे विक्रमसिंह भोसले यांनी केल्या भावना व्यक्त

~ सकल मराठा समाज कोल्हापूरतर्फे दुबई वरून कोल्हापूरात आल्यानंतर विक्रमसिंहभोसले व प्रियांका भोसले यांचा सपत्नीक सत्कार

कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज 4” ~ विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

“अह तंजावर.. तह पेशावर.. अवघा मुलूख आपला” या छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या विचाराने भारावून “अह कॅनडा तह.. आस्ट्रोलीया” हाच मंत्र महाराष्ट्रातील युवकाना तारू शकतो. कोल्हापूरकरांच्या पाहुणचाराने भारावून गेलो. अशा भावना छत्रपती मराठा साम्राज्य आर्गोनायजेशनचे विक्रमसिंह भोसले यांनी व्यक्त केल्या.

दुबई वरून कोल्हापूरात आल्यानंतर सकल मराठा समाज कोल्हापूरतर्फे दुबई वरून गुरुवारी (दि. 24 जुलै 2025) कोल्हापूरात आल्यानंतर विक्रमसिंहभोसले व प्रियांका भोसले यांचा संपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

~ छत्रपती मराठा साम्राज्यचे उल्लेखनीय कार्य

छत्रपती मराठा साम्राज्य संघटना व विक्रमसिंह भोसले यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातून येणाऱ्या शेतकरी, कष्टकरी समाजातील युवक~युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित होऊन दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून अठरापगड जातीतील मराठा युवक अनेक देशात जोडले जात आहेत.

~ कोल्हापुरी फेटा व शाल अर्पण करून गौरव..

दुबई वरून कोल्हापूरात आल्यानंतर शिवशाहीर दिलीप सावंत यांच्या पुढाकाराने विक्रमसिंहभोसले व प्रियांका भोसले यांचा संपत्नीक सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांना कोल्हापुरी फेटा व शाल अर्पण करून गौरव करण्यात आला. तसेच कोल्हापूरातील सकल मराठा समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक व मराठा महासंघचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या हस्ते विक्रमसिंहभोसले व प्रियांका भोसले यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

~ याप्रसंगी उपस्थित मान्यवर असे…

याप्रसंगी मराठा सेवा संघ राज्य उद्योजक कक्षचे सजंय काटकर, मराठा सेवा संघचे अश्विन वागळे, मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, उद्योजक राजू लिंग्रज, जयशभाई कदम, उदय लाड, विजय पाटील, शैलेजा पाटील, मराठ महासंघ महीला जिल्हाध्यक्ष संयोगिता देसाई, गितांजली काटकर, शाहीर तृप्ती सावंत, विनायक काटकर, यश पाटील आदी सकल मराठा समाज संघटनेतील पदाधिकारी उपस्थित होते.

You may also like

error: Content is protected !!